Sunday, November 24, 2024
Homeक्राईमनवरात्रोत्सवाच्या वादातून जेलरोड परिसरात गोळीबार; एक जण अटकेत

नवरात्रोत्सवाच्या वादातून जेलरोड परिसरात गोळीबार; एक जण अटकेत

नाशिक | प्रतिनिधी
नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी स्थापन केलेल्या मित्र मंडळातील सदस्यांत काहीतरी कारणांतून वाद झाल्याने उपस्थित असलेल्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. ही घटना दि. २२ रोजी रात्री ११ अकरा वाजता जेलरोडच्या मॉडेल कॉलनीतील शिवशक्ती जलकुंभ गार्डनजवळ घडली असून दाखल फिर्यादीनुसार, चारपैकी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे तक्रारदार व संशयित हे एकमेकांचे मित्र असून वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाल्याचे तपासात समोर येते आहे. नितीन राजेंद्र बर्वे, संतोष पिल्ले, संतोषचा मित्र भागवत आणि एक अनोळखी व्यक्ती अशी संशयितांची नावे आहेत. त्यातील नितीन बर्वे याला अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरु आहे. सुयोग खंडेराव गुंजाळ (वय ३२, रा. माणिकमोती सोसा, मॉडल कॉलनी गणपती मंदिरासमोर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते व संशयित ओळखीतील मित्र असून परिसरातील वसंतविहार मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी यावर्षी त्यांची निवड झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, (दि.२२) रोजी रात्री १० वाजता गुंजाळ हे मॉडेल कॉलनीतील गार्डनजवळ बसलेले असतांना, त्यांना नितीन बर्वे याचा फोन आला. तेहा गुंजाळ यांनी ‘नवरात्रोत्सवाची तयारी करत असताना माझ्यावरच सगळी जबाबदारी असून कुणीच धावपळ करत नाहीये आणि तुम्ही इकडे तिकडे फिरत’ असल्याचे म्हटले. त्याचवेळी बर्वे याने आम्ही वर्गणी घेण्यासाठी संतोष पिल्ले यांच्याकडे आलो आहे. ते यंदा चांगली वर्गणी देणार आहे, असे सांगितले. मात्र, गुंजाळ याने ‘तुम्ही मग फिरत बसा, संतोष पिल्ले गेला उडत’ मला नाही करायची नवरात्र, अध्यक्षपदही नको असे म्हटले. हे वाद झाल्यावर रात्री अकरा वाजता संशयित कारमधून आले व त्यांनी गुंजाळची भेट घेऊन गार्डनमध्ये जाण्यासाठी कारमध्ये बसण्यास सांगितले.

मात्र, गुंजाळने नकार देत घर गाठले. यानंतर संशयित कारमधून गार्डनजवळ आले, त्यांनी हवेत गोळीबार केला. याबाबतची फिर्याद गुंजाळ यांनी दाखल केली असून तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत. तर, सर्वच संशयित हे मद्यार्काचे सेवन करुन वादवावाद घालत असतांना हा गोळीबार झाला. दरम्यान, गोळीबार हा एअरगनमधून केल्याचा दावा काही संशयितांनी केला आहे. त्यादृष्टीने तपास सुरु आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या