अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyangar
जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. आता याबाबतचा शासन निर्णयही जारी केला आहे. त्यामुळे या निर्णया अंतर्गत जैन समाजाला लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या महामंडळाची कार्ये पुढीलप्रमाणे- जैन समाजाच्या कल्याण आणि विकासासाठी काम करणे व त्यांचे सामाजिक सक्षमीकरण करणे, जैन समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरीता कर्ज उपलब्ध करून देणे व त्यांची वसुली करणे, अतिप्राचिन जैन तीर्थांचे संरक्षण व संवर्धन, जैन ग्रंथांचे संरक्षण व पुनर्लेखन, कायम पायी विहार करणार्या जैन साधू संतांच्या विहारासाठी सुरक्षा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या जैन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती शैक्षणिक कर्ज, जैन समाजाच्या विधवा, परित्यक्ता महिलांसाठी विशेष योजना.
जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या योजना
25% बीज भांडवल योजना-
राष्ट्रीयीकृत बैंका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून योजना राबविणे, महामडळाचा सहभाग 25 टक्के, बँकाचा सहभाग 5% असेल, या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु.5 लक्ष असेल.
व्याजाचा दर 4 % असून परतफेडीचा कालावधी 5 वर्ष असेल.
1 लक्ष रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना –
शासनाकडून प्राप्त नागभांडवलातून महामंडळ ही योजना राबवेल, 1 लक्ष पर्यंत थेट कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. लाभार्थीचा सहभाग निरंक. 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल रु. 2.085/- नियमित परतफेड करणार्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. नियमित कर्जाची परतफेड न करणार्या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकित होतील त्या रकमेवर द.सा.द.शे. 4% व्याज आकारण्यात येईल.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रु.10.00 लक्ष –
शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रक्कमेतून महामंडळ ही योजना राबवेल. बँकेकडून कर्जमर्यादा रु.10 पर्यंत असेल. बँकेकडून 1. लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हा हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) त्यांच्या आधार लिक, बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. कुटुबातील एकाच व्याज येता येईल.बेबपोर्टल किवा महामंडळांच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य.कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार.
गट कर्ज व्याज परतावा योजना 10 ते 50 लाख –
बँकेकडून प्रती गटास कमीत कमी 10 लाख ते 50 लाखांपर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणीकरीता. पात्र शेतरकी उत्पादक गटांना 10 लाखांपर्यंत बिनव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योगासाठी देण्यात येणार आहे.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना–
जैन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या उच्च शिक्षणासाठी राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 ला तसेच परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लाख रूये बँकेकडून कर्ज मंजूर केलेल्या रकमेवर कमाल 8% व्याजदरापर्यंत सहायक अनुदान रकमेतून करण्यात येईल.
प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत गृह कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांकरिता कर्ज व्याज परतावा योजना –
जैन समाजीतील ज्या लाभार्थ्यांंनी प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत गृह कर्ज घेतलेले आहे, त्यांना बँकेकडून कर्ज मंजूर केलेल्या रक्कमेवर कमाल 8% व्याज दरापर्यंत व्याज परतावा शासनाकडून प्राप्त सहायक अनुदान रकमेतून महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.
महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना –
राज्यातील महिला बचत गटातील जैन प्रवर्गातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आधारित उद्योगांकरीता बँकमार्फत मंजूर करण्यात आलेल्या रु.5ते 10लक्षपर्यंतच्या कर्ज रक्कमेवरील 12% व्याजाच्या मर्यादेत शासनाकडून प्राप्त सहायक अनुदान रकमेतून महामंडळामार्फत अदा करण्यात येईल. या मंडळाच्या मुख्यालयासाठीही 15 पदे मंजूर करण्यात आली आहेत.