मुंबई | Mumbai
मुंबईचा धाकड युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने ((Yashasvi Jaiswal)) IPL 2023 मध्ये चमकदार कामगिरी करत शतक झळकावले. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीपासून ते मोहम्मद कैफपर्यंत सर्वजण त्याला लवकरच टीम इंडियात स्थान मिळणार याबाबत बोलत होते.
या २१ वर्षीय सलामीवीरासाठीही मोठी बातमी आली आहे. यशस्वी जैस्वाल आता WTC फायनलसाठी इंग्लंडला जाणार आहे.आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर आता भारतीय संघामध्ये त्याची वर्णी लागली आहे.
IPL 2023 Final वर पावसाचे सावट, सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता?
माध्यमांतील वृत्तांनुसार चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) जून 3-4 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऋतुराज गायकवाडला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले होते. पण आपल्या लग्नामुळे तो वेळेत संघासोबत जोडला जाऊ शकणार नव्हता.
माहितीनुसार, ऋतुराज 5 जूननंतर संघासोबत जोडला जाऊ शकत होता. मात्र, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना त्यापूर्वीच संपूर्ण संघ इंग्लंडमध्ये हजर हवा आहे. असात द्रविड यांच्या सांगण्यावरून यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) याला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडले गेले आहे. हा सामना 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Crime News : दारूच्या नशेत पतीने केलं भयंकर कृत्य, गाढ झोपेत असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या
यशस्वी जैस्वाल स्टँडबाय खेळाडू म्हणून संघासोबत असेल आणि जर सलामीवीर दुखापतीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे खेळू शकला नाही तर त्याला खेळण्याची संधी मिळू शकते. टीम इंडियाचे काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी लंडनला पोहोचले आहेत.
28 मे रोजी आयपीएल फायनल संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, मोहम्मद शमी, शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा लंडनला रवाना होतील. विराट कोहली आधीच लंडनला रवाना झाला आहे.