Wednesday, January 7, 2026
Homeनगरजलजीवन व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित कामांचा अहवाल सादर करा - ना....

जलजीवन व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित कामांचा अहवाल सादर करा – ना. विखे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

जलजीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रलंबित कामांचा अहवाल चालू महिन्याच्या अखेर सादर करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष योजनांची पाहणी करावी, तसेच योजनेच्या कामामुळे गावातील रस्त्यांच्या निर्माण झालेल्या प्रश्नासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

- Advertisement -

राहाता पंचायत समितीच्या सभागृहात मंत्री विखे पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळे, जलजीवन मिशनच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते गणेश भोगावडे व हितेंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी विवेक गुंड आदी उपस्थित होते.

YouTube video player

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, योजनामध्ये पाईप टाकताना रस्त्यांच्या निर्माण झालेल्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन योजनेतील तरतुदीनुसार रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. लोणी बुद्रुक व लोणी खुर्द येथे ऑक्टोबर 2025 पर्यंत पाणी पुरवठा योजना सुरू होईल, यासाठी आवश्यक त्या सर्व कामांची पूर्तता करण्यात यावी. ममदापूर येथील टाक्या व पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने मार्गी लावावीत. वाकडी येथील पाइपलाइनचे काम डांबरी रस्त्यावर न करता पर्यायी मार्गाने पूर्ण करण्यात यावे.

रस्ते खोदल्यावर माती उघड्यावर पडणार नाही याची अधिकार्‍यांनी दक्षता घ्यावी. धनगरवाडी येथील रखडलेली कामे तत्काळ पूर्ण करावीत. कडीत येथील जुन्या पाणीपुरवठा योजनेतील साचलेली घाण त्वरित स्वच्छ करण्यात यावी. अनेक ठिकाणी उन्हामध्ये पडून पाइपलाइन खराब झाल्याचे निदर्शनास आले असून, विभागाने त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सोनगाव पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी राहुरी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधावा. पाइपलाइनसाठी डांबरी रस्ते खोदणे टाळावे.

जिथे रस्ते खोदण्यात आले आहेत, त्या ठिकाणांची माहिती संकलित करून अहवाल सादर करावा. पाणीपुरवठा योजनेतील अनियमिततेचा सविस्तर अहवाल तयार करावा. निमगाव जाळी पाणीपुरवठा योजनेसाठी महसूल विभागामार्फत जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दाढ बुद्रुक, कोल्हेवाडी, शिंगवे, पिंपळवाडी-नपावाडी, कोर्‍हाळे वाळकी, खडकेवाके, डोर्‍हाळे, साकुरी, पुणतांबा या गावांतील जलजीवन मिशन योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनांतर्गत सावळीविहीर बुद्रुक, अस्तगाव, नांदुर्खी, पिंपरी निर्मळ, बाभळेश्वर, चितळी, जळगाव या गावांतील व संगमनेर तालुक्यातील आश्वी व चिंचोली येथील कामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करताना संबंधित ठेकेदारांनी शासकीय यंत्रणांना विश्वासात न घेता कामे केली. यामुळे गावागावातील रस्ते खराब झाले आहेत. याची कोणावर तरी जबाबदारी निश्चित करावी लागेल. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर लवकरच बैठक घेणार असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...