Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्याजलज शर्मा यांनी स्वीकारला नाशिक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

जलज शर्मा यांनी स्वीकारला नाशिक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले जलज शर्मा यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या मुख्य दालनात पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पार पडली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितिन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे, तहसिलदार परमेश्वर कासोळे, नरेश बहिरम, नायब तहसिलदार विजय कच्छवे, विधी अधिकारी हेमंत नागरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक ओळख करून संवाद साधला. पत्रकारांशी बोलतांना शर्मा म्हणाले की, सध्या पावसाळा लांबला आहे. पाणी टंचाईची स्थिती आहे. मात्र अजुन दोन महीने असल्याने  तो पर्यंंत परीस्थिती सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली. आपण इतर ठिकाणी केलेल्या कामांपेक्षा नाशिक जिल्हा मोठा आहे. त्यामुळे आव्हाने खुप राहणार आहेत. सगळ्यांन बरोबर घेऊन काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या