Saturday, July 27, 2024
Homeनगरपाथर्डीत कडकडीत बंद, मोर्चाद्वारे नोंदवला निषेध

पाथर्डीत कडकडीत बंद, मोर्चाद्वारे नोंदवला निषेध

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पाथर्डी तालुका बंदची हाक देऊन पाथर्डी शहरातून निषेध मोर्चा काढला. यावेळी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंदोलनकर्त्यांनी केली.

- Advertisement -

आज सकाळपासून पाथर्डी शहरातील व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला. शहरातील वसंतराव नाईक चौकातून सकाळी मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शहरातील कोरडगाव चौक, नवी पेठ, क्रांती चौक, अजंठा चौक मार्गे हा मोर्चा पुन्हा वसंतराव नाईक चौकामध्ये येऊन या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. निघालेल्या मोर्चामध्ये आयोजकाच्या वतीने दिवसभर पाथर्डी शहर बंद ठेवण्याचे आवाहन करून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

तालुक्यातील कोरडगाव, माणिकदौंडी व मिरी या गावांनीही बंद पाळला शहरातील स्व.वसंतराव नाईक चौकात झालेल्या सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अँड. प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, अकोल्याचे माजी उपसरपंच उद्धव माने, देवा पवार, चंद्रकांत भापकर, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख, सिताराम बोरुडे, लक्ष्मण डांगे, अतिश निर्‍हाळी, मराठा महासंघाचे डॉ. रामदास बर्डे, दिगंबर गाडे, चांद मणियार, हुमायून आतार, अंकुश चितळे, लक्ष्मण डोमकावळे, बबलू वावरे, सोमनाथ बोरुडे, पप्पू पालवे, उद्धव दुसंग, पांडुरंग काकडे, पंडित देवढे, जुनेद पठाण, अमोल पाठक, लाला शेख, सोमनाथ माने आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अ‍ॅड. ढाकणे म्हणाले, मराठा समाजाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलनाच्या सर्व बाजूने अचानक मोठा पोलीस फाटा आंदोलकांवर हल्ल्याच्या तयारी करून अचानक मनुष्यबळाचा वापर करून लाठीचार्ज केला. यात महिला, पुरुष, वयोवृध्द, मुले यांना अमानुषपणे जखमी केले गेले असं काय घडले. निर्दयपणे आंदोलकांवरती तसेच ग्रामस्थांवर काठ्या चालवल्या गेल्या याचा जाब गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दिला पाहिजे. नैतिक जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी राजीनामा द्यावा.

पोलिसांची दिवसभर गस्त

तनपुरेवाडी येथे मोहटादेवी फाटा या ठिकाणी अज्ञात रस्त्यावर टायर जाळण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, जगदीश मुलगीर,पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर दिवसभर शहरात व तालुक्यामध्ये गस्त सूरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या