Saturday, July 27, 2024
Homeनगरमराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज हा सरकारचा...; आ. थोरातांची संतप्त प्रतिक्रिया

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज हा सरकारचा…; आ. थोरातांची संतप्त प्रतिक्रिया

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

जालना (Jalana) जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर (Maratha Protestors) पोलिसांकरवी झालेला लाठीचार्ज (Police Baton Charge) हा सरकार पुरस्कृत भ्याड हल्ला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून सरकारचा अमानुषपणा ढळढळीतपणे दिसतो आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

अंबडच्या लाठीमाराचा जिल्ह्यात निषेध

मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Community Reservation) मागणीसाठी अनेक आंदोलने (Movement) सातत्याने करीत आहे, लोकशाहीने त्यांना दिलेला तो हक्क आहे. पोलिस बाळाचा वापर करून आंदोलन (Movement) चिरडणे योग्य नाही. चर्चेच्या माध्यमातून अनेक आंदोलनांमध्ये मार्ग निघालेला आहे हा आजवरचा इतिहास आहे.

लम्पीच्या सतर्कता जिल्ह्यात नगरचा समावेश

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. या बाबी मराठा आंदोलकांसह आम्ही देखील वारंवार सरकारच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी तथाकथित महाशक्तीचे सरकार असताना मार्ग निघत नसेल तर मराठा समाज अस्वस्थ होणारच आहे. सरकारने आंदोलकांची मनोभूमिका समजून न घेता आंदोलन चिरडण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्ह आहे.

शासनाला शेतकरी प्रोत्साहन योजनेचा विसर; 6 महिन्यापासून याद्या बंद

- Advertisment -

ताज्या बातम्या