Saturday, July 27, 2024
Homeनगरमराठा समाजाच्या आंदोलकांवरील हल्ल्याचा अकोलेत निषेध

मराठा समाजाच्या आंदोलकांवरील हल्ल्याचा अकोलेत निषेध

अकोले |प्रतिनिधी| Akole

जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या अकोले बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहर व परिसरातील व्यापार्‍यांनी या बंदमध्ये कडकडीत सहभाग नोंदविला. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. शाळा, महाविद्यालये यांनीही विद्यार्थ्यांना सुट्टी देत बंद ला पाठींबा दिला. बस स्थानक परिसरातून घोषणा देत आंदोलकांनी दुपारी तहसिल कार्यालयावर मोर्चा नेऊन तहसील आवारातच निषेध सभा घेतली.

- Advertisement -

यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, शेतकरी नेते डॉ. अजित नवले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, सभाजी ब्रिगेडचे डॉ. संदिप कडलग, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, बाजार समितीचे माजी सभापती पर्बतराव नाईकवाडी, संपतराव नाईकवाडी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, भाजपाचे शहराध्यक्ष सचिन शेटे, मनसेचे तालुका प्रमुख दत्ता नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदिप भानुदास शेणकर, अकोले शहराध्यक्ष अमित नाईकवाडी, शिवसेना नगरसेवक नवनाथ शेटे, अगस्ति पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भोर, मराठा सेवा संघाचे दिलीप शेणकर, बबनराव तिकांडे, संचालक गणेश पापळ, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष गणेश कानवडे, उबाठा गटाचे शहराध्यक्ष नितिन नाईकवाडी, सामाजिक कार्यकर्ते राहुल शेटे, माजी नगरसेवक परशराम शेळके, मोहसिन शेख, अमोल वैद्य, बी. आर. एस चे नेते संदिप शेणकर, सोमनाथ नवले, एकनाथ मेंगाळ, डॉ. असिफ तांबोळी, मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष शाहिदभाई फारुकी, सलीमखान पठाण, संपतराव पवार, किशोर शिंदे, शांताराम संगारे, सी. एम. नवले, राजेद्र कुमकर, विजय आवारी, विनोद हांडे, अनिल कोळपकर, अनिल भळगट, सुरेश नवले आदी उपस्थित होते.

आ. डॉ. किरण लहामटे म्हणाले, लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलनावर पोलिस दलाचा वापर करणे चुकीचे आहे. सरकारने सरकारची बाजू मांडणे आवश्यक होते. झालेल्या लाठीचार्जची जबाबदारी सरकारने घेऊन चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. घटनेत पोलिसांना आदेश देणार्‍याचा शोध घेऊन तातडीने त्याच्यावर कारवाई करावी किंवा यात कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता सहभागी असेल तर त्याने तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आ. डॉ. लहामटे यांनी केली.

किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी जालन्यातील घटनेत लहान मुले, महिलांना सुद्धा पोलिसांनी मारहाण केली. अशा निर्दयी घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.

कालची घटना आवडलेली नसेल तर मराठा समाजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही राजीनामा द्या व त्यांना पाठींबा देणार्‍यांनीही तशी भुमिका घ्यावी केवळ घटनेचा निषेध करु नका, असा टोला आ. डॉ. लहामटे यांचे नाव न घेता डॉ. अजित नवले यांनी त्यांना लगावला.

भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ म्हणाले, मराठा समाजाचे प्रश्नासाठी मी सदैव रस्त्यावर उतरून आंदोलने करायला तयार आहे. कुणीही उठायचे आणि आमच्या मराठ्याचे आंगावर यायचे. मराठा समाजाचे आरक्षण राजकारणाच्या आखाड्याने घालवले. सर्वच पक्षांनी मराठ्याचा फक्त राजकारणासाठी फायदा घेतला. पक्ष म्हणून नाही फक्त जात म्हणून एकत्र या. आरक्षण मिळाले नाही तर आमदार, खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशी भुमिका घ्या. आरक्षण मिळण्यासाठी क्रांती घडवावी लागेल. मुख्यमंत्री व एक उपमुख्यमंत्री मराठा आहे. त्यांनी कालच्या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी धुमाळ यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंतराव मनकर, काँग्रेसचे नेते मिनानाथ पांडे, आरपीआयचे नेते चंद्रकांत सरोदे, राष्ट्रसेवा दलाचे विनय सावंत, विद्रोही संघटनेचे नेते स्वप्निल धांडे, डॉ. आसिफ तांबोळी, कु. तनुजा घोलप आदींची भाषणे झाली. सूत्रसंचलन भाऊसाहेब नाईकवाडी यांनी केले. तर आभार डॉ. संदिप कडलग यांनी मानले. निवासी नायब तहसीलदार मुळे यांनी निवेदन स्विकारले. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवलाहोता.

मराठा समाजातील सर्वपक्षीय तरुण कार्यकर्ते व निवडक नेते मंडळी यांनी एकत्रित येत या निषेध मोर्चा व बंदचे नियोजनासाठी शुक्रवारी रात्रीपासून परिश्रम घेतले मात्र आजच्या निषेध सभेत ऐनवेळी आलेल्या सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची भाषणाची हौस म्हणून एकमेकांच्या पक्ष व नेत्यांवर आगपाखड करण्यात आली. आ. डॉ. लहामटे हे सभा संपताना तेथे पोहचले व त्यांच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना भाषणाचा आग्रह केला, त्यांचे भाषण सुरू झाल्यावर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी मधीलच काही नेते, कार्यकर्ते यांनी तेथून बाहेर जाणे पसंत केले. अशा नाराजी नाट्यातच आ. डॉ. लहामटे यांना आपले भाषण करावे लागले. सभा संपल्यानंतर काही आयोजकांनी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या ऐनवेळी केलेल्या घुसखोरी बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदिप शेणकर, माजी नगरसेवक सचिन शेटे, गणेश पापळ आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष शाहिदभाई फारुखी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत मराठा समाजाच्या या आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा जाहीर केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या