Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Andolan: आंदोलनाचे पडसाद जालना शहरातसुध्दा; आंदोलकांनी खाजगी वाहने जाळली, पोलिसांकडून हवेत...

Maratha Andolan: आंदोलनाचे पडसाद जालना शहरातसुध्दा; आंदोलकांनी खाजगी वाहने जाळली, पोलिसांकडून हवेत गोळीबार

जालना| Jalana

जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जची (Lathi Charge)घटना शुक्रवारी समोर आली होती. यावेळी जोरदार दगडफेक आणि पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. त्यानंतर आज पुन्हा जालन्यात दगडफेक आणि लाठीचार्जची घटना समोर आली आहे.

- Advertisement -

जालना शहरातील अंबड (Ambad) चौफुली येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात शहरासह परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा जमाव अनियंत्रित होऊन आंदोलकांनी खाजगी वाहनांची जाळपोळ सुरू केली.

Maratha Andolan: मराठा मोर्चा आंदोलनाचा धसका; अनेक जिल्ह्यातील एसटी वाहतूक सेवा बंद

या ठिकाणी ट्रकला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणी मोठा बंदोबस्त लावून जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केला. याठिकाणी अश्रुधुराच्या कांड्या फोडण्यात आल्या. तसेच बदनापूर रोडवरील एका शासकीय वाहनाला देखील अज्ञातांनी आग लावण्याचा प्रयत्न केला.

Maratha Andolan: मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे…

त्यामुळे आंदोलनात हिंसक वळण लागलेले असून अधून मधून पोलिसांवर आंदोलकांकडून दगडफेक सुरू आहे. सध्या शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला असून तणावपूर्ण शांतता आहे. तर घटनास्थळी आता दंगा काबू पथक तैनात करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या