Saturday, May 4, 2024
Homeजळगावकर्जमुक्तीचे दीड लाखांच्यावर खाते अपलोड

कर्जमुक्तीचे दीड लाखांच्यावर खाते अपलोड

जळगाव  –

राज्य शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आतापर्यत आधार प्रमाणीकरण अद्यावतीकरण झालेल्या 11 हजार 918 कर्ज खातेधारकांच्या कर्जापोटी 119 कोटी 35लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत. तर आतापर्यत कर्जमुक्ती योजनेंतर्गत 1 लाख 65 हजार 10 कर्ज खाते अपलोड करण्यात आले असून 19 हजार 318 कर्ज खातेधारकांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक असल्याची माहिती सहकार विभाग सुत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेंतर्गत आतापर्यत 1 लाख 65 हजार 10 कर्जखातेदार शेतकर्‍यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 43 हजार 832 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरणासह विशिष्ट क्रमांक देण्यात काम पूर्ण झाले आहे.

यात 1 लाख 24 हजार 513 शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांना विशिष्ठ क्रमांक देण्यात आले आहेत. तर शिल्लक असलेल्या 19 हजार 318 कर्जखात्यांना विशिष्ठ क्रमांक देण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आधार प्रमाणीकरणासह विशिष्ठक्रमांक देण्यात आलेल्या 11 हजार 918 कर्जखात्यांवर संबधित बँकाकडे आतापर्यत 119 कोटी 35 लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.

ग्रामीण विकासो व बँकामार्फत सादर झालेल्या थकीत कर्जखात्यांपैकी 5270 शेतकर्‍यांचे आधारक्रमांक व इतर तांत्रिक बाबींमुळे प्रमाणीकरण होण्यात अडचणी येत नसल्याने तक्रारी जिल्हा समन्वय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. यावर जिल्हा समन्वय समितीकडून 164 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
तर 2हजार 443 प्रकरणांच्या तक्रार निवारण प्रलंबीत आहेत.

तालुका तहसिल स्तरावर आतापर्यत 1हजार 338 कर्ज तक्रारीचे निवारण करण्यात आले असून 1हजार 355 प्रकरणे प्रलंबीत आहेत. सन 2015 ते सप्टेबर 2019 पर्यत परंतु मार्च 2019 पर्यत पीककर्ज मुद्दल व त्यावरील व्याज थकीत असलेल्या कर्ज खात्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे व त्यातील तक्रारीचे निवारण तातडीने उपाययोजना करुन हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याकरीता संबंधित बँकांनी कर्जदार शेतकर्‍यांचे आधार व इतर माहिती दररोज सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. माहिती सादर कताना संबंधित शेतकर्‍याचा विशेष क्रमांकही सादर करावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या