जळगाव – jalgaon
जळगाव जिल्ह्यात एक गुलाबो गॅंग उदयास आली आहे. ही गुलाबो गॅंग अफजल खाना पेक्षाही वाईट आहे. लुटमार करणाऱ्या या गुलाबो गॅंगचा नायनाट करण्याचा संकल्प करा असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आज येथे केले.
# भेंडवळ घट मांडणीचे भाकीत ; यंदा पेरणी उशिरा, अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा त्रास
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा साकारला जात आहे. या पुतळ्याच्या भूमिपूजनाप्रसंगी खासदार राऊत बोलत होते. खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की भर उन्हात हा कार्यक्रम होत आहे. परंतु उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केवळ व्यासपीठावर सावली न देता सर्वसामान्यांच्या डोक्यावर देखील छप्पर लावले आहे. अन्यथा आपण व्यासपीठावर आणि जनता उन्हात तडफडते, मरते असे सांगत त्यांनी श्री सदस्यांच्या मृत्यूवरून शिंदे सरकारला टोला लगावला.
# भेंडवळ घट मांडणीचे भाकीत ; यंदा पेरणी उशिरा, अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा त्रास
तसेच ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊनच शिवसेना निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कवी कुलभूषण यांनी राजांची महती काव्यातून साकारली होती. आज कुलभूषण यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभा राहत आहे. कार्यक्रमांमध्ये घुसण्याची भाषा झाली, बघूया कोण घुसतय ते. जळगाव जिल्ह्यातल्या या गुलाबो गॅंग बरोबर तुम्हाला लढायचे आहे. जळगाव जिल्ह्यातून या गुलाबो गॅंगचा नायनाट करा असे आवाहन खासदार राऊत यांनी केले. तसेच जेव्हा केव्हा हे स्मारक पूर्ण होईल, तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे उद्धव ठाकरे यांना उद्घाटनासाठी आणू असेही खासदार राऊत यांनी शेवटी सांगितले.