Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजJalgaon BJP Politics : भाजपने खान्देशात खाते उघडले; धुळ्यात तीन तर जळगावात...

Jalgaon BJP Politics : भाजपने खान्देशात खाते उघडले; धुळ्यात तीन तर जळगावात एक उमेदवार बिनविरोध

*शिंदेंच्या पक्षालाही लॉटरी लागली!*

जळगाव | Jalgaon

महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी १०३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यानंतर काल (बुधवारी) झालेल्या छाननी प्रक्रियेत १९ प्रभागांतील एकूण १३५ अर्ज बाद झाले. त्यामुळे आता एकूण ९०३ अर्ज वैध ठरले आहेत. छाननीदरम्यान तांत्रिक त्रुटी आणि राजकीय समन्वयाच्या अभावामुळे अनेकांचे अर्ज बाद झाले. यामध्ये भाजपच्या (BJP) माजी महानगराध्यक्षा उज्वला बेंडाळे यांच्याविरोधात दाखल असलेला अर्ज फेटाळण्यात आल्याने त्या बिनविरोध (Unopposed) विजयी झाल्या.

- Advertisement -

तर धुळे महानगरपालिका निवडणुकीतही (Dhule NMC Election) भाजपने धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजीत राजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली. प्रतिस्पर्धी विरोधातील उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने उज्ज्वला भोसले या बिनविरोध निवडून आल्या.तर ज्योत्सना प्रफुल्ल पाटील यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर आज (गुरुवारी) माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक १७ मधून अपक्ष उमेदवार रेखा संजय बगदे यांनी माघार घेतल्यामुळेभाजपच्या सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता धुळ्यात भाजपचे तीन उमेदवार निवडणुकीपूर्वीच विजयी झाले आहेत. ह्या विजयामुळे भाजपची आता विजयाकडे घोडदळ सुरू झाली असून पुढील काही वेळात अजून काही नगरसेवक हे बिनविरोध होतील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : नाशिकरोडच्या भाजप कार्यालयाबाहेर आमदार ढिकलेंविरोधात निष्ठावंतांची घोषणाबाजी; शहराध्यक्षांना घातला घेराव

राज्यभरात महापालिका निवडणुकांचा धुराळा उडताना दिसत आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविकांची बिनविरोध निवड झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपने विजयाचे पहिलं खाते उघडले. या ठिकाणी तीन जण बिनविरोध झाले आहेत. यानंतर खान्देशातील धुळे व जळगाव या दोन महापालिकांमध्येही भाजपने बिनविरोध खाते माघारी आधीच उघडले आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे सारे लक्ष नाशिकवर केंद्रीत असल्याने त्यांचे शिलेदार जळगाव व धुळे महापालिकेच्या निवडणुकीची सुत्रे सांभाळत आहेत. त्यामुळे उद्या माघारीपर्यंत अजून किती जागा बिनविरोध होतात याकडे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जळगाव महापालिकेसाठी (Jalgaon MC Election) महायुती झाली असून, भाजप ४६, राष्ट्रवादी (अजित पवार गट) ६ आणि शिवसेना (शिंदे गट) २३ जागा लढवत आहेत. यात काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या उमेदवारांची आयात-निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारीवरून भाजपात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. राज्यात भाजपचे ८ हून अधिक उमेदवार विजयी झाल्यानंतर जळगावात शिंदे सेनेच्या रूपाने महायुतीचा आणखी एक उमेदवार विजयी झाला आहे.

हे देखील वाचा : Nashik MC Election : छाननीत २७७ अर्ज बाद; २,०७९ अर्ज वैध, माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट

शिंदे सेनेलाही लागली लॉटरी!

जळगावमध्ये प्रभाग क्रमांक १८ अ मधील उमेदवार तथा आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे समजते. ठाकरेंच्या सेनेचे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मयूर सोनवणे यांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे डॉ. गौरव सोनवणे हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर प्रभाग क्रमांक ९ अ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...