Saturday, July 27, 2024
Homeजळगावजिल्ह्यात नव्याने 59 करोनाबाधित आढळले

जिल्ह्यात नव्याने 59 करोनाबाधित आढळले

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज 7 जानेवारी रोजी करोनाचे 59 नवे रुग्ण आढळून आले असून एकूण करोनाबाधितांची संख्या 56 हजार 183 एवढी झाली आहे.

- Advertisement -

दिवसभरात एका बाधिताचा मृत्यू झालेला आहे. दुसरीकडे 39 जण कोरोनामुक्त झाले आहे . जळगाव ग्रामीण, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर आणि बोदवड या तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत 54 हजार 356 जणांनी कोरोनावर मात केली आहे . तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 334 एवढ्या बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 16,भुसावळ 6, अमळनेर 4, चोपडा 15, पाचोरा 2, भडगाव 1,धरणगाव 1, पारोळा 13 व इतर जिल्ह्यातील एक असे एकूण 59 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

गुरूवारी दिवभरात चाळीसगाव तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या