Saturday, May 4, 2024
Homeजळगावजिल्ह्यात 42 नवे बाधित रुग्ण

जिल्ह्यात 42 नवे बाधित रुग्ण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज 3 फेब्रुवारी रोजी नव्याने 42 करोनाबाधित रुग्ण आढळून आले . एकूण करोना बाधितांची संख्या 57 हजार 168 एवढी झाली आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात एकाही बाधितांचा मृत्यू झाला नसून 37 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज जिल्ह्यातील पंधरा केंद्रावर 1 हजार 49 आरोग्य कर्मचार्‍यांनी लस टोचून घेतली.

जिल्ह्यात अमळनेर, धरणगाव, एरंडोल, रावेर, पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 461 जणांनी कोरोनावर मात केली आहे . तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 359 बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 13, जळगाव ग्रामीण 1, भुसावळ 3, चोपडा 16, पाचोरा 1, यावल 1, जामनेर 1, चाळीसगाव 6असे एकूण 42 नवे रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 1 हजार 49 जणांनी घेतली लस

जिल्ह्यातील पंधरा केंद्रावर आज लसीकरणाची मोहिम पार पडली. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 142, जामनेर 32, चोपडा 74, मुक्ताईनगर 62, चाळीसगाव 40, भुसावळ 56, अमळनेर 113, पाचोरा 50, रावेर 73, यावल 77, डी. बी. जैन रुग्णालय जळगाव 101, गोल्डसिटी जळगाव 80, भडगाव 87 तर बोदवड 62 असे एकूण 1 हजार 49 जणांनी लस टोचून घेतली. आतापर्यंत 7 हजार 687 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला असल्याचे शल्यचिकीत्सकांनी सांगितले.

पारोळ्यात दुसर्‍या दिवशीही एकाही जणाने टोचून घेतली नाही लास

पारोळा येथे लसीकरणासाठी केंद्र तयार करण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवसापासून याठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात लसीकरण केले जात आहे.

सलग दुसर्‍या दिवशी देखील या केंद्रावर आज एकही आरोग्य कर्मचार्‍याने लस टोचून घेतली नाही त्यामुळे आतापर्यंत या केंद्रावर केवळ 384 आरोग्य कर्मचार्‍यांनी लस टोचून घेतली असून जिल्हाभरात सर्वात कमी लसीकरण याच ठिकाणी झाले असून कर्मचार्‍यांमध्ये लसीबाबत निर्त्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या