जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
शहरासह जिल्ह्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहे. दिवसभरात 772 रुग्ण आढळले असून, पाच बाधितांचा मृत्यू झाल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. जळगाव शहरात सर्वाधिक 359 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 359, जळगाव ग्रामीण 23, भुसावळ 64, अमळनेर 19, चोपडा 108, पाचोरा 2, भडगाव 2, धरणगाव 24, यावल 17, एरंडोल 48, जामनेर 13, रावेर 3, पारोळा 15, चाळीसगाव 51, मुक्ताईनगर 18, बोदवड 6, असे एकूण 772 रुग्ण आढळून आले आहेत.
आज शुक्रवारी पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर दोन तर चोपडा, धरणगाव, भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 63 हजार 422 कोरोना बाधित झाले आहे. तर दुसरीकडे 57 हजार 895 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आतापर्यंत 1 हजार 401 बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.