जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून करोना बाधीताच्या संख्येत घट होत असतांना शुक्रवारी पुन्हा नव्याने 403 रुग्ण आढळुन आले आहे.
यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 46 हजार 275 इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 91, जळगाव ग्रामीणमधील 13, भुसावळ येथील 66, अमळनेरातील 29, चोपडा येथील 30, पाचोरा येथील 02, भडगावातील 04, धरणगाव 20, यावल येथील 33, एरंडोल येथील 21, जामनेरातील 18, रावेर येथील 07, पारोळा येथील 24, चाळीसगावमधील 25, मुक्ताईनगरातील 10, बोदवड येथील 05 परजिल्ह्यातील 05 रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 36 हजार 781 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 820 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 8 हजार 349 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 08 रुग्ण शुक्रवारी दगावले.
यापैकी 04 मृत्यू शासकीय वैद्यकिय महविद्यालय, 02 मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय, 02 मृत्यू अमळनेर, मृत्यू झालेल्यांमध्ये अमळनेर तालुक्यातील 60,76 वर्षीय पुरुष, एरंडोल तालुक्यातील 65 वर्षीय पुरष, रावेर तालुक्यातील 75,76 वर्षीय पुरुष, जळगाव शहरातील 70 वर्षीय महिला, जळगाव तालुक्यातील 70 वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यातील 39 वर्षीय महिलेचा समावेश आहे.