Saturday, July 27, 2024
Homeजळगावजळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आढळले 322 रुग्ण

जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आढळले 322 रुग्ण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा नव्याने 322 रुग्ण आढळुन आले आहे.

- Advertisement -

यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 48 हजार 806 इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 69, जळगाव ग्रामीणमधील 9 , भुसावळ येथील 28, अमळनेरातील 14 , चोपडा येथील 25, पाचोरा येथील 17, भडगावातील 16, धरणगाव 4, यावल येथील 14, एरंडोल येथील 5, जामनेरातील 6, रावेर येथील 5, पारोळा येथील 6, चाळीसगावमधील 19, मुक्ताईनगरातील 77, बोदवड येथील 6, परजिल्ह्यातील 2 रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 42 हजार 343 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 889 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 5 हजार 572 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एका रुग्ण शुक्रवारी दगावला. यापैकी एक मृत्यू जळगाव शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव तालुक्यातील 69 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या