Friday, May 3, 2024
Homeजळगावसाखळी तुटतेय मात्र खबरदारी आवश्यकच !

साखळी तुटतेय मात्र खबरदारी आवश्यकच !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हा प्रशासनाकडून कोविड-19 अंतर्गत विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीसह अनलॉक प्रकिया टप्प्याने राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

त्यामुळे जिल्हयात कोरोनाची साखळी हळुहळू तुटत असली तरी प्रत्येक नागारीकांने देखिल आपली स्वतःची वैयक्तीक जबाबदारी ओळखून सोशल व फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.

जिल्हयात गुरूवार दि.1 आक्टोबर रोजी 909 रूग्ण उपचाराअंती बरे झाले असून महिनाभरात 20150 रूग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची बाब जिल्हयासाठी समाधानकारक आहे.

जिल्हयात अनलॉक प्रक्रिया टप्पा 5नुसार रेस्टाँरंट, हॉटेलसह अन्य सुविधा सुरू करण्यात येत आहेत. टप्प्याटप्प्याने अनेक सुविधा कार्यान्वित होत आहेत. त्यामुळे रस्यांवर नागरीकांची वर्दळ वाढणार असल्याने आगामी काळात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरीकांनी सतर्क राहूनच सोशल व फिजीकल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.आगामी काळात कोरोनाची दुसरी लाट येण्याची देखिल शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे नागरीकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा वर्क फ्र ॉम होमला प्राधान्य देण्यात यावे असे देखिल आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी

असे असले तरी आगामी काळात नागरीकांनी आवश्यकतेनुसार घराबाहेर निघतांना मास्क, सॅनिटायझरसह अन्य प्रतिबंधात्क साहित्याचा आवश्यकतेनुसार वापर केल्यास ग्रामीण भाग, तालुकास्तरासह जिल्हाभरात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असा आशावाद जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी दै. देशदूतशी बोलतांना व्यक्त केला.

मार्च महिन्याच्या तिसर्‍या सप्ताहात कोरोनाचा संशयित रूग्ण आढळून आला होता. तेव्हापासून ते आतापर्यत जिल्हयात कोरोना बाधीत रूग्णसंख्या सप्टेबर महिनाअखेर 48हजार 484 पर्यत पोचली असून त्यापैकी 41हजार 454 रूग्ण बरे झाले असून जिल्हयाचा रिकव्हरी रेट देखिल 85.50 टक्क्यांवर पोचला आहे. जिल्हयात विविध ठिकाणी असलेल्या कोविड केअर सेंटरसह रूग्णालयांत लक्षणे नसलेल्या 4655 रूग्णांसह लक्षणे असलेल्या 1185रूग्णांवर उपचार केले जात असून मृत्यूदरात देखिल घट झाली असून गत आठवडयात असलेला 2.47टक्के मृत्यूदर 2.45टक्क्यापर्यत खाली आलेला आहे. सप्टेबर अखेर 351 रूग्णांचा तर आतापर्यत जिल्हयात 1184 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

870 अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे 93 हजार 511 तर रॅपिड न्टीजेन टेस्टद्वारे 1 लाख 9 हजार 35 अशा एकूण 2 लाख 2 हजार 546 तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 52 हजार 655 चाचण्या निगेटिव्ह तर 47 हजार 907 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 114 असून 870 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या