Wednesday, September 11, 2024
Homeजळगावजिल्ह्यात आढळले 298 करोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात आढळले 298 करोनाबाधित रुग्ण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात शनिवारी पुन्हा नव्याने 298 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील

- Advertisement -

एकूण रुग्णसंख्या 49 हजार 104 इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 76, जळगाव ग्रामीणमधील 11 , भुसावळ येथील 22, अमळनेरातील 06 , चोपडा येथील 25, पाचोरा येथील 07, भडगावातील 02, धरणगाव 07, यावल येथील 04, एरंडोल येथील 01, जामनेरातील 04, रावेर येथील 07, पारोळा येथील 03, चाळीसगावमधील 07, मुक्ताईनगरातील 104, बोदवड येथील 05, परजिल्ह्यातील 03 रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 43 हजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 805 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 4 हजार 758 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 07 रुग्ण शनिवारी दगावले.

यापैकी दोन मृत्यू डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, एक मृत्यू गोल्डसीटी हॉस्पिटल, एक मृत्यू मुक्ताईनगर, एक मृत्यू अष्टविनायक हॉस्पिटल तर दोन मृत्यू गणपती हॉस्पिटलमध्ये झाले आहेत.

मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 67 व 69 वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यातील 67 वर्षीय पुरुष, एरंडोल तालुक्यातील 86 वर्षीय पुरुष, 40 गाव तालुक्यातील 69 वर्षीय पुरुष, व मुक्ताईनगर तालुक्यातील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या