Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्ह्यात आढळले 57 करोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात आढळले 57 करोनाबाधित रुग्ण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा नव्याने 57 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या

- Advertisement -

54 हजार 234 इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात एका रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 13, जळगाव ग्रामीणमधील 06, भुसावळ येथील 07, अमळनेरातील 01 , चोपडा येथील 03, पाचोरा येथील 01, भडगावातील 00, धरणगाव 02, यावल येथील 00, एरंडोल येथील 01, जामनेरातील 01, रावेर येथील 03, पारोळा येथील 02, चाळीसगावमधील 00, मुक्ताईनगरातील 15, बोदवड येथील 00, परजिल्ह्यातील 02 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 52 हजार 484 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 37 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 460 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मंगळवारी एका रुग्णाचा उपचार घेत असतांना गणपती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या