जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
पिस्तुलचा धाक दाखवित 15 लाखांची लूट करणा-या मनोज उर्फ खुशाल अशोक मोकळ व रितीक उर्फ दादू राजेंद्र राजपूत या दोघांना एलसीबीने उल्हासनगर येथून अटक केली.
त्यांच्याकडून 9 लाख 10 हजाराची रक्कम हस्तगत केली आहे. हे दोघ संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक व धुळे येथे गुन्हे दाखल आहे.
या दोघांना अटक केल्यानंतर आपण ऐशो आरामाचे जीवन जगण्यासाठी लूट करतो. तसेच यातील रितीक राजपुत हा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मल्लं असल्याचमाहिती त्यानी पोलिसांना दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ़ प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
शहरातील पांडे चौक ते ईच्छादेवी चौफुली दरम्यान असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महेश मोहनचंद्र भावसार व संजय सुधाकर विभांडीक या दोघांना पिस्तुलचा धाक दाखवून 15 लाख रूपयांची रोकड लुटल्याची घटना 1 मार्च रोजी भरदिवसा सायंकाळी 5़ 20 वाजता पंचममुखी हनुमान मंदिराजवळ घडली होती़ लूट करीत असतांना लुटारूंनी त्यांच्याकडील दुचाकी व पिस्तुलमधील मॅग्झीन खाली पडली आणि त्या लुटारुंनी घटनास्थळाहून पळ काढला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवित संशयित आरोपी मनोज उर्फ खुशाल अशोक मोकळ व रितीक उर्फ दादू राजेंद्र राजपूत या दोघांना उल्हासनगर येथून अटक केली.
तपासासाठी दोन कंटोल रुम
लूटीची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस व एलसीबीचे स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले होते़ या पथकांना तांत्रिक माहिती देण्यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम सुध्दा स्थापन केले गेले होते़ या कंट्रोल रूममधून पोलीस कर्मचारी विजय पाटील व नरेंद्र वारूळे यांच्याकडून माहिती पुरविली जात होते़
पोलिसांच्या हातावर दिली तूरी
पोलिस मागावर असल्याचे कळताच दोघ संशयित सापुतार्याला निघून गेले. यावेळी सुरत चेकपोस्टवर पोलिसांनी त्या दोघांकडे असलेल्या रकमेबाबत चौकशी केली असता. त्यांनी घरबांधकामासाठीचे हे पैसे असल्याचे सांगत पोलिसांच्या हातावर तूरी देवून ते याठिकाणी पसार झाल्याचे त्यांनी चौकशीत कबुल केले.
दोघ संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
संशयित रितीक राजपुत हा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मल्लंचा खेळाडून असून त्याच्यावर धूळे येथे एक गुन्हा दाखल आहे. तसेच मनोज मोकळ याच्यावरही नाशिक येथे 3 तर धूळे येथे 2 असे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत़. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली पिस्तोल सुध्दा पोलिसांनी हस्तगत केली आहे़ ही कारवाई एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्निल नाईक, रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे, संतोष मायकल, भारत पाटील यांनी केली आहे़