Saturday, April 26, 2025
Homeजळगावजळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

जळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी |

 शंकररावनगरातील ५२ वर्षीय व्यक्तीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजेपूर्वी घडली.
 गिरीश डाणू सावदेकर (वय ५२, रा.शंकररावनगर, डीएनसी कॉलेजजवळ) हे मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते एमआयडीसीतील चॉकलेट कंपनीत कामाला होतेे. शनिवारी ते सकाळी कामावर जात होते. परंतु, अर्ध्या रस्त्यातून ते घरी परत आले. त्यांचे दुमजली घर आहे,  गिरीश सावदेकर हे वरच्या मजल्यावर राहतात. त्यांच्या पत्नी योगिता सावदेकर या तळा मजल्यावरील घरात दिरानी सोबत पापड करीक होत्या. वरच्या मजल्यावर कोणीही नसताना त्यांनी आतल्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्यांचे लहान भाऊ किशोर सावदेकर हे वरील मजल्यावर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी योगिता, मुलगीबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहेत.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लष्कराची मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून...

0
नवी दिल्ली | New Delhi जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगामजवळ असलेल्या बैसरन खोऱ्यात दहशतावाद्यांनी पर्यटकांच्या हत्या केली. या भ्याड हल्ल्यानंतर (Attack) भारतीय लष्कर आणि सुरक्षा...