Wednesday, April 2, 2025
Homeजळगावजळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक

जळगाव : खुबचंद साहित्यांवरील हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक

जळगाव | प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावरील प्राणघातक हल्लोप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.
संशयित आरोपी राकेश चंदू आगरिया (२२, रा.वाघनगर, जळगाव) व नीलेश नंदू पाटील (२४, रा.कोल्हेनगर, मूळ रा.फागणे, ता. धुळे) हे दोघं  पोलिसांना मंगळवारी दुपारी शरण आले. तर गणेश अशोक बाविस्कर (वय २५, रा. तुरखेडा, जि.जळगाव) आणि नरेंद्र चंदू आगरिया (वय  २४, रा.वाघनगर, जळगाव) असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

चौघांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी माजी महापौर ललित कोल्हे व आणखी दोन जण फरार आहेत.  या प्रकरणात १० ते १२ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. नवीपेठेतील गोरजाबाई जिमखान्यात खुबचंद साहित्या यांच्यावर १६ रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर साहित्या यांच्यावर शहरात प्राथमिक उपचार करुन दुसर्‍या दिवशी त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime News : मुलीवर अत्याचार करणार्‍यास आजन्म कारावास

0
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori नातेसंबधांचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Rape) करुन पीडिता गरोदर राहून प्रसुत झाल्याचा आरोप सिद्ध झाल्याने मामा-भाचीच्या नात्याला काळीमा...