जळगाव | प्रतिनिधी
शेतात पाणी भरुन येतो, असे सांगून गेलेल्या तरुणाचा रेल्वे रुळावर संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
बंटी उर्फ दीपक बापू पाटील (वय २२, रा. धानोरा, मोहाडी ता.जळगाव) हा शेती काम करायचा. रविवारी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास जेवण करुन शेतात भरणा करण्यासाठी जातो, असे सांगून तो घराबाहेर पडला. रात्री भरणा करुन घरी न आल्याने घरातील आई-वडील आणि भावांना चिंता वाटली. वडील बापू गंगाधर पाटील आणि लहान भाऊ हर्षल बापू पाटील यांनी रात्री धानोरा शिवारातील शेतात जावून पाहणी केली. मात्र तो आढळला नाही. त्यानंतर वडील आणि लहान भावाने शेतापासून जवळ असलेल्या रेल्वे रुळावर पाहणी केली असता रात्री १०.३० वाजत रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आला. दरम्यान, आत्महत्या की घातपात, हे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
आज बघणार होता मुलगी
बंटी हा सोमवारी मुलगी पाहण्यासाठी कुटुंबासोबत बाहेरगावी जाणार होता. मयताच्या पश्चात आई सुरेखा, वडील बापू पाटील, लहान भाऊ हर्षल आणि विवाहित बहिण असा परीवार आहे.
जळगाव : धानोरा येथील तरुणाचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

ताज्या बातम्या
संपादकीय : २९ मार्च २०२५ – वल्लीमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन।
वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे....