Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव : करोनाविरूध्द लढाईत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे योगदान ; श्रीसदस्यांनी केले स्वयंस्फुर्तीने...

जळगाव : करोनाविरूध्द लढाईत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे योगदान ; श्रीसदस्यांनी केले स्वयंस्फुर्तीने रक्तदान

जळगाव –
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता.अलिबाग, जि.रायगड) यांच्यातर्फे सरकारी रक्तपेढी जळगाव, सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी रक्तदान केले.

रक्तपेढीचे डॉ.एल.एन.त्रिपाठी यांनी या उपक्रमास मार्गदर्शन तर रक्तपेढीचे सचिन बकाल, भरत महाले, निलेश पवार यांचे सहकार्य लाभले. प्रतिकूल परिस्थितीतही आयोजित केलेले रक्तदान शिबीर व सदस्यांची शिस्तबद्धता यांचे त्यांनी कौतुक केले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानतर्फे रक्तदानासह विविध समाजसेवी उपक्रम राबवले जात असतात.

- Advertisement -

आज शनिवार दि.२३ मे २०२० रोजी घेतलेल्या या रक्तदान शिबीरात शासकीय रक्तपेढीच्या मागणीनुसार ५५ श्रीसदस्यांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन रक्तदान केले. यापुढेही आवश्यकता भासल्यास व शासनातर्फे मागणी आल्यास प्रतिष्ठानचे सदस्य रक्तदान करण्यास पुढे येतील असा विश्वास सदस्यांनी बोलून दाखविला.

सध्या कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगात असताना सगळीकडे रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक नागरीकाने आपले योगदान देणे गरजेचे आहे. जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या मागणीला प्रतिसाद देत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग जि.रायगडचे संस्थापक डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने सदर रक्तदान शिबीर घेण्यात आले.

शासन नियमांचे पालन करून प्रतिष्ठानचे श्रीसदस्यांनी ५० रक्तपिशव्यांचे रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती असलेल्या नि:ष्काम भावनेतून धर्माधिकारी प्रतिष्ठानने शिबीर आयोजित केले होते. श्रीसदस्यांची स्वयंशिस्त, निर्भिडपणा आणि सामाजिक अंतराचे पालन पाहून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या