Wednesday, May 22, 2024
Homeजळगावमार्फोसिस प्रथम तर ईस्टमन कलर द्वितीय

मार्फोसिस प्रथम तर ईस्टमन कलर द्वितीय

जळगाव  – 

राज्य नाट्य स्पर्धेत नाट्यभारती इंदूर या संस्थेच्या मार्फोसिस या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. तर मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव या संस्थेच्या ईस्टमन कलर या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. जय गणेश फाउंडेशन भुसावळ या संस्थेच्या झेंडूचं फूल या नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

- Advertisement -

येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान झालेल्या 59व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा निकाल 7 डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे.

स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकांमध्ये दिग्दर्शन प्रथम – श्रीराम जोग (नाटक मार्फोसिस), द्वितीय पारितोषिक – हेमंत पाटील (नाटक ईस्टमन कलर), अभिनय रौप्यपदक पुरुष – श्रीराम जोग (मार्फोसिस), श्रध्दा पाटील (ईस्टमन कलर), प्रकाशयोजना प्रथम – अविनाश इंगळे (ईस्टमन कलर), द्वितीय अभिराम कळमकर (मार्फोसिस), नेपथ्य प्रथम – दिनेश माळी (ईस्टमन कलर), अनिरुध्द किरकिरे (मार्फोसिस), रंगभूषा प्रथम – दीपाली दाते (मार्फोसिस), द्वितीय – प्रज्ञा बिर्‍हाडे (ईस्टमन कलर), वैयक्तिक अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र – हर्षा शर्मा (हलगी सम्राट), नेहा झारे (ध्यानी-मनी), हर्षा बोरोले (जतरा), प्रतीक्षा बेलसरे (मार्फोसिस), संजीवनी यावलकर (झेंडूचं फूल), हेमंत प्रकाश (ईस्टमन कलर), राज गुंगे (जतरा), अनिल चापेकर (ध्यानी-मनी), हनुमान सुरवसे (हलगी सम्राट), जयेंद्र लेकुरवाळे (शकुंतला एक विरह).

15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 21 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरुण भडसावळे (मुंबई), संजय कुलकर्णी (अमरावती), डॉ. नयना कासखेडीकर (पुणे) यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे व केंद्र समन्वयक सरिता खाचणे यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या