जळगाव –
घरकुल घोटाळ्यातील दोषी असलेल्या 5 ते 6 नगरसेवकांना 17 रोजी मनपात हजर राहण्याच्या नोटिसा प्रशासनाने काढल्या आहेत.
घरकुल घोटाळ्यात दोषी ठरलेल्या या नगरसेवकांमध्ये भाजपा गटनेते भगत बालाणी, नगरसेवक लता भोईटे, स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, नगरसेवक दत्तात्रय कोळी यांचा सामावेश आहे.
या सर्वांना 14 दिवसाची कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या नगरसेवकांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 17 रोजी हजर राहावे लागणार आहे. घरकुल घोटाळ्याचा निकाल 31 ऑगस्ट रोजी लागला होता.
यात सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 48 आजी माजी नगरसेवकांना शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर काही नगरसेवक दोन महिन्यांनी जामिनावर सुटले. प्रत्येक नगरसेवकास दंडाची रक्कम भरावी लागली होती.
त्यानंतर काही दिवसांपूर्वीच सर्व नगरसेवकांना जामीन झाला आहे. मात्र यातील 5 ते 6 नगरसेवक आताही निवडून आलेले आहेत. हे नगरसेवक दोषी ठरविण्यात आले आहे.
मात्र त्यांच्यावर कारवाई होणार की नाही? याबाबत केवळ चर्चा होती. आता मात्र या नगरसेवकांना 17 रोजी मनपात हजर राहण्याबाबत नोटिसा काढण्यात आल्या आहेत.