न्हावी, ता.यावल (वार्ताहर) –
कै.दादासाहेब जे.टी.महाजन (माजी गृहराज्यमंत्री) यांनी आपल्या भागातील तरुणांनी शिकून उच्च पदे प्राप्त करावी यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाची उभारणी केली. शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालया प्रमाणे सर्व सुविधा मिळाव्यात, म्हणून हा सुंदर परिसर निर्माण केला.
भव्य, दिव्य, सुशोभित व अद्ययावत अभियांत्रिकी महाविद्यालय या परिसराचा श्वास आहे. याची जाणीव ठेवून अभियांत्रिकी महाविद्यालयाची समृद्धता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक आजी-माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तरच भावी पिढीला या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घ्यायची संधी मिळेल असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अस्तित्व २०२०’ च्या उदघाटन प्रसंगी केले.
महाविद्यालयातील डिगंबर शेठ नारखेडे या सभागृहात कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी संस्थाध्यक्ष शरद महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर उपाध्यक्ष मार्तंड भिरूड, संचालक शशिकांत चौधरी, रामा पाचपांडे, प्राचार्य डॉ.आर.डी.पाटील, अकॅडेमिक डीन डॉ.पी.एम.महाजन, सर्व विभाग प्रमुख व अस्तित्व 2020 या स्पर्धेचे प्रमुख डॉ.जी.ई.चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला डॉ.जी.ई.चौधरी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. नंतर दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत समारंभात व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित पत्रकारांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
‘अस्तित्व ‘२०२०’ या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी मदतीचा हात दिला, अशा व्यक्तींचा सुद्धा याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर.डी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर महामंडलेश्वर आचार्य संतपंथ रत्न जनार्दन महाराज यांनी मनोगत व्यक्त करीत बहुमोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात माननीय शरद महाजन यांनी “अस्तित्व 2020” हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडेल अशा शुभेच्छा आयोजकांना व विद्यार्थ्यांना दिल्या.
अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात खूप काही शिकवून जातात तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर टाकतात असे मार्गदर्शन केले. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त “जागतिक मराठी भाषा दिन” साजरा करताना डॉ.के.जी.पाटील यांच्या मागोमाग सर्व उपस्थितांनी मराठी भाषा वापरासंबंधी शपथ घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी प्राजक्ता राणे, अपूर्वा भोरटक्के व नेहा जावळे यांनी केले. त्यांच्यासोबत डॉ.के.एस.भगत, प्रा.एम.जी. भंडारी यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थी समन्वयक म्हणून सुरज सरोदे, युवराज किरंगे, हर्षल जोगी, हेमंत पांगळे, आकाश चौधरी, धिरज महाजन, स्वप्निल सरोदे, रेश्मा आगे, युगल नेमाडे, राहुल नेहेते, ऋषी पाटील यांनी परिश्रम घेतले