Friday, November 22, 2024
Homeजळगावआ.गिरीश महाजनांचे खडसेंना खुले आव्हान

आ.गिरीश महाजनांचे खडसेंना खुले आव्हान

पंकजा मुंडे, अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचा पराभव करणार्‍या स्वपक्षातील लोकांची नावे जाहीर करा !

जळगाव – 

पक्षात कुणीही कुणाला पाडण्याचे उद्योग करणार नाही. खडसे यांना जर संशय असेल तर त्यांनी असे काम करणार्‍यांची  नावे पुराव्यासह जाहीर करावीत, असे  खुले आव्हान आ.गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना दिले आहे.

- Advertisement -

भाजपाच्या पंकजा मुंडे व मुक्ताईनगरातील उमेदवार अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत कारवाया करुन पाडल्याचा आरोप निरर्थक आहे. मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे 2014 च्या निवडणुकीत कमी फरकाने विजय झाले होते.

यंदा तर अ‍ॅड. रोहिणी खडसेंविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रस हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंकजा मुंडे व रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत कारवाया करुन पाडल्याचा एकनाथराव खडसे यांच्या आरोपावर शुक्रवारी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना पत्रकारांनी विचारणा केली.

त्यावेळी महाजन यांनी सांगितले की, भाजपाने कायम ओबीसींना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका ठेवली आहे. सत्तेत असताना अनेक महत्त्वाच्या मंत्रिपदावर ओबीसी नेतेच होते. मुक्ताईनगरात मागील काळात एकनाथराव खडसे एकवेळा 1200 मतांनी विजयी झाले होते.

तसेच मोदी लाट असतानाही त्यांना 8500 मताधिक्य होते. यंदा तर या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे ती पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होऊन रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. कदाचित रोहिणी खडसेंऐवजी एकनाथराव खडसे असते तर विजयी झाले असते, असेही महाजन यांनी सांगितले.

कुणीही पक्ष सोडणार नाही

भाजपातील नेते पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याच्या केवळ अफवा व कल्पना आहेत. कुणीही पक्ष सोडणार नाही. भाजप एकसंध आहे आणि राहील, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या