Monday, March 31, 2025
Homeजळगावजळगाव : मोहाडीजवळ वाळूचे ट्रॅक्टर खड्ड्यात पडल्याने चालकाचा मृत्यू

जळगाव : मोहाडीजवळ वाळूचे ट्रॅक्टर खड्ड्यात पडल्याने चालकाचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – 

वाळूने भरलेले ट्रॅक्टर चालवितांना खड्ड्यात टॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.१३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

विनोद महारू मालचे (वय -४०) रा. मोहाडी ता.जि.जळगाव हा ट्रॅक्टर चालक आहे. आज दुपारी १२ वाजता नागझिरी मधून वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून जात असतांना रस्त्यातच रेल्वेलाईन शेजारी पूलाचे काम सुरु असल्याने एका ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या बाजूला पडलेल्या खड्डयात ट्रॉलीसह ट्रॅक्टर पलटी झाले व ८ ते १० फुट खोल खड्ड्यात पडले.

यात विनोदचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोहेकॉ रतिलाल पवार, निलेश भावसार, जितेंद्र राठोड यांनी तात्काळ जाऊन त्याचे मृतदेह बाहेर काढला. व शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले. याप्रकरणी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. एमआयडीसी पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar : “मी गुढी-बिढी काही…”; काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांचे विधान...

0
मुंबई | Mumbai राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) इतरांना उद्देशून गायलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे नवा वाद...