Monday, April 28, 2025
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३२ लाखांची मदत

जळगाव : जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३२ लाखांची मदत

समाजातील दात्यांनी सढळ हस्ते मदत करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

जळगाव कोविड-१९ व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आजवर जिल्ह्यातून एकूण ३२ लाखांची मदत देण्यात आलेली आहे. समाजातील दात्यांनी पुढे येऊन कोरोनाच्या प्रतिकारासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद

सध्या कोरोनाच्या प्रतिकारासाठी सर्व स्तरांवरून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी लॉकडाऊन सुरू असून समाजाच्या विविध स्तरांमधून मदतीचे हात देखील पुढे येत आहेत. यासाठी राज्य स्तरावर कोविड-१९ मदतनिधी उभारण्यात येत असून याला जिल्हा वासियांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यात प्रामुख्याने बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, रतनलाल बाफना ज्वेलर्स, श्री क्षेत्र गणपती पद्मालय, जळगाव क्रय-विक्रय संस्था, युगाश्री जय साई हाऊस प्रा. लि.; सनशाईन अ‍ॅग्री प्रा. लि.; चिन्मय मिशन, अभय मुथा, सुशील बहुमंडळ, विद्युत तांत्रीक कामगार संघटना, राजेश शहा, ओमप्रकाश सीताराम अग्रवाल, अग्रीमा रिटेलर्स व राजेश शहा या प्रमुख दात्यांचा समावेश आहे.

सहकारी कॉटन मार्केटींग फेडरेशनची मदत

आज दि. 17 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटींग फेडरेशनने १,११,१११ रूपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रदान केला. फेडरेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी हा धनादेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना सुपुर्द केला.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्रेणी-१ सुभाष राऊत, नवल पाटील, चांदसरचे उपसरपंच रमेश पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

मदतीसाठी समोर या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जिल्ह्यातून चांगल्या प्रमाणात मदत करण्यात येत असली तरी अजून समाजातील दात्यांनी समोर येण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांनी वैयक्तीक पातळीवर मदत करावी. यासोबत सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असणार्‍या सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आदींनीही यासाठी हिरीरीने समोर येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...