Saturday, April 26, 2025
Homeजळगावजळगाव : ‘नही’च्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; नशिराबाद ग्रा.पं.चे जिल्हाधिकार्‍यांना...

जळगाव : ‘नही’च्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; नशिराबाद ग्रा.पं.चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नशिराबाद, ता.जळगाव । वार्ताहर

महामार्ग क्र. 6 वर जळगाव-नशिराबाद दरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठी जिवघेणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे आजपर्यंत अनकजणांचे प्राण गेले असून आज दि.4 रोजी दूरदर्शन टॉवर समोर झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सुध्दा खड्ड्यांमुळेच घडली असून सदर खड्डे यापुर्वी बुजले असते तर आजची ही दुर्घटना टळली असती. त्यामुळे या महिलेच्या मृत्यूस राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधीकरण विभाग जबाबदार असल्याने संबंधीतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन नशिराबाद ग्रा.पं.सरपंच विकास पाटील व पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

- Advertisement -

महामार्गावरील खड्डे बुजण्या संदर्भात माजी सरपंच पंकज महाजन यांनी दि.22 नोव्हेंबर रोजी प्रकल्प निर्देशक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग जळगाव यांना दिले होते. या निवेदनात भुसावळ-जळगाव दरम्यान महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याचे लक्षात आणून दिले होते व ते खड्डे तत्काळ बुजण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली होती व खड्डे न बुजल्यास होणार्‍या अपघातांना संबंधीत विभाग जबाबदार असेल असेही नमूद केले होते.

महामार्ग दुरूस्तीसाठी नशिराबाद ग्रामपंचायत व माजी सरपंच पंकज महाजन यांचेसह ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी वेळोवेळी संबंधीत विभागाला लेखी, तोंडी सांगूनही अद्याप त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. तरी संबंधीत विभागाने याकडे लक्ष देवून महामार्गावरील खड्डे तत्काळ बुजण्यात यावेत व होणारे अपघात टाळावेत अशी मागणी होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...