जळगाव –
पिंप्राळा हुडकोमधील बेपत्ता एका चार वर्षीय चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास संशयास्पदरित्या तिच्याच राहत्या घराजवळील बिल्डींगच्या जिन्यात आढळला.
- Advertisement -
या बेपत्ता बालिकेचा मृतदेह पाच तासांनी आढळला आहे. या बालिकेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे घरी नेलेला मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.