Monday, March 31, 2025
Homeजळगावबेमोसमी पावसाचा जिल्हयाला फटका

बेमोसमी पावसाचा जिल्हयाला फटका

जळगाव- 

जिल्हा परीसरात गेल्या दोन दिवसांपासून बेमोसमी पावसाचा फटका बसत असून सोमवार सकाळी भुसावळ तर आज सकाळी जळगाव शहरासह अन्यत्र तुरळक पावसाच्या सरींनी हजेरी लावली होती. दोनतीनदिवसांपासून जिल्हा परीसरात धुकेयुक्त  व ढगाळ विषम वातावरण असल्याने रब्बी पिकांसह कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून येत असून सर्वसामान्यांना देखिल अनेक साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

जिल्हा परीसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून बेमोसमी पावसाचा फटका रब्बी पिकांवर होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोमवार १६ रोजी सकाळी भुसावळ तालुका परीसरात तर आज सकाळी जळगावसह अन्यत्र तुरळक स्वरूपात पावसाच्या सरींनी हजेरी लावली होती. दोन तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून सकाळी ढगाळ धुकेयुक्त तर दुपारी दमट असे विचित्र वातावरणामुळे जिल्हा परीसरात रब्बी पिकांसह कपाशी, मका आदी पिकांवर किड रोगांसह बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या