रावेर | प्रतिनिधी
येथील एका प्रतिष्ठित इसमाने ‘स्तंभ रावेर तालुका परिसर’ या ग्रुपवर विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना भडकतील असा संदेश टाकल्याने, त्यांना रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी कलम १४९ नुसार नोटीस बजावली आहे.
या पोस्ट मुळे शहर व परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तंबी त्यांना देण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती कडून खुलासा देखील टाकण्यात येऊन जाहीर माफी मागण्यात आली आहे.
- Advertisement -