Thursday, May 15, 2025
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण  

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण  

जळगाव  – 

- Advertisement -

जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांपैकी ५४ व्यक्तीचे तपासणी अहवाल मंगळवारी रात्री प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३० ते ४५ वर्षादरम्यानच्या सात पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

तर  ४७ संशयित रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  कोरोना बाधित सात रुग्णांपैकी चार रुग्ण अमळनेरचे असून जळगाव, पाचोरा व भुसावळच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

हे सर्व रुग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे. दरम्यान, या अगोदर मंगळवारी पहाटे दोन रुग्णांचा मृत्यूनंतर पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. मंगळवारी दिवसभरात एकूण ९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात आता कोरोना पॉझिटिव्ह एकूण २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...