Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रCrime News: महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची यात्रेत छेडछाड

Crime News: महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची यात्रेत छेडछाड

जळगाव । Jalgoan

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याचं प्रकरण ताजे असतानाच जळगावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत काही टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

- Advertisement -

रक्षा खडसे यांची मुलगी तसेच तिच्या मैत्रिणींसोबत यात्रेला गेली होती. या यात्रेत टवाळखोरांनी छेड काढली.केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक पावित्रा घेतला आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पाहायला मिळत आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचं काय, असा सवाल केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे.

नेमकी घटना काय?

मुक्ताईनगर येथे यात्रा महोत्सव सुरू आहे. या यात्रा महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुलगी मैत्रिणींसह गेली होती. यावेळी काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली. सुरक्षारक्षकांनी टवाळखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु टवाळखोर त्यांच्यासमोर बधले नाहीत. त्यांनी शेरेबाजी करणे सुरुच ठेवले. तसेच मुलींना धक्काबुक्कीही झाली.

या घटनेबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, अशा घटना दुर्देवी आहेत. मुक्ताईनगरच नाही तर राज्यभरात अशा घटना घडत आहेत. ज्यावेळी माझ्या नातीने मला हे सांगितले त्यावेळी मी तिला सांगितले की, तू स्वत: जाऊन तक्रार कर. कारण अशा घटनांमध्ये मुली तक्रार करायला घाबरतात म्हणूनच मी तिला पाठवले. पोलिसांनी या गुंडांना थांबले तर त्यांनी पोलिसांना देखील मारहाण केली. महायुतीच्या आमदारांकडून हा गुंडांना पाठबळ मिळतंय.

रोहिणी खडसे याबद्दल बोलताना म्हणाल्या की, राज्यात दडपशाही आणि गुंडगर्दी वाढली आहे. महायुतीचे मंत्री या गुंडांना साथ देत आहेत. एका मंत्र्यांचीच मुलगी जर सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांच्या महिला मुली या कशा सुरक्षित राहणार हा एक मोठा प्रश्न आहे प्रशासनाने महिलांसंदर्भात एक कडक कायदा लागू करावा अशा टवाळखोरांना या कायद्याचा धाक राहील नाहीये. कडक कारवाई ही केली पाहिजे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...