Friday, May 24, 2024
HomeनाशिकMaratha Andolan : जालन्यातील घटनेचा नाशकात निषेध

Maratha Andolan : जालन्यातील घटनेचा नाशकात निषेध

नाशिक | Nashik

जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतरवाली सराटी गावामध्ये (Antwarli Sarati Village) शुक्रवार (दि.०१ सप्टेंबर) रोजी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषणास (Hunger Strike) बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी (Police) लाठीचार्ज केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे आंदोलकांनी (Protester) आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली होते. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावार जाळपोळ करण्यात आली होती. तसेच यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस देखील जखमी झाले होते.

- Advertisement -

Nashik News : गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत पारख यांचे अपहरण

या घटनेनंतर राज्यभरात सकल मराठा समाज आक्रमक झाला असून या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी प्रशासन व राज्यशासनाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सकल मराठा समाजाकडून नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यातील काही भागांत अत्यावश्यक सेवा सोडून बंद पुकारण्यात आला. तसेच काही ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आला. तर नाशिक शहरात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सीबीएस परिसरातील (CBS Area) छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करत सरकारच्याविरोधात घोषणा देत पायी रॅली काढण्यात आली.

Sinnar Crime News : भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश; लाखोंचा साठा हस्तगत

यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मार्गदर्शनाखाली पोलिसांना लाठीमार व गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते असे म्हटले. तसेच आम्हाला आरक्षण नाही तर सरकारने बंदुकीचा गोळ्या दिल्या असून जालन्यामध्ये शांततेच्या मार्गाने उपोषण सुरु असतांना पोलिसांना मराठा समाजाच्या नागरिकांवर लाठीमार करण्याचे आदेश कुणाच्या सांगण्यावरून देण्यात आले असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी विचारत शिंदे-फडणवीस-पवार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी ठाकरे गटाचे नेते सुनील बागुल, विलास शिंदे, दत्ता गायकवाड, स्वराज्य पक्षाचे संपर्कप्रमुख करण गायकर, यांच्यासह आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Road News : बनावट गुटखा बनविणारा कारखाना उद्ध्वस्त

- Advertisment -

ताज्या बातम्या