Tuesday, November 19, 2024
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Patil : कालिचरण महाराजांवर मनोज जरांगेंचा पलटवार; म्हणाले, “टिकली लावणारे...

Manoj Jarange Patil : कालिचरण महाराजांवर मनोज जरांगेंचा पलटवार; म्हणाले, “टिकली लावणारे संत…”

जालना । Jalana

‘काही जाती पातीच आरक्षण नाही तर हिंदुत्व तोडायला निघालेला राक्षस आहे, अशी बोचरी टीका कालिचरण महाराज यांनी नाव न घेता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली होती. या टीकेला आता मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

बाबाला काही गरज नव्हती. आरक्षण आणि बाबांचा काय संबंध येतो. या बाबाने बरच सांगितलं. बाबांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे, हे त्यांचं काम आहे. आरक्षण काय हे शिकवण त्यांचं काम नाही. हा विचित्र प्राणी आहे. तू का बाबा आहे का हेंद्र्या? माझ्या आई बहिणीवर हल्ला झाला होता तेव्हा तू कुठे गेला होता? हा टिकल्या, गंध लावतो…नथ घालतो, असं म्हणत मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हिंदू धर्मावर ज्यावेळी संकट येतं. तेव्हा आम्ही समोर येतो. तुला मी कधी बोललो नाही. तू वर आणि खाली वेगळा दिसतो. तुला कधी मी बोललो नाही. बाबा तुला आमचं दुःख कळायचं नाही. तुम्ही पाकिटं घेऊन किर्तनं करता, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. गरिबांच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतं ते विचार, हिंदूत अर्धा एकटा मराठा आहे. तू सुपारी घेतली असेल, असं म्हणत मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान ज्यांच्या मतदारसंघात कालिचरण महाराज यांचा कार्यक्रम झाला त्या संजय शिरसाट यांनी यावर भूमिका मांडली असून त्यांनी कालीचरण यांच्या टिप्पणीपासून हात झटकले आहेत. संजय शिरसाठ यांनी म्हंटल आहे की, काल माझ्या मतदारसंघामध्ये कालिचरण महाराजांची जी सभा झाली त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. ना मी त्यांना भेटलोय, ना त्यांच्या सभेला उपस्थित राहिलो आहे. ना माझं कुठे बॅनर आहे. अशी जेव्हा बातमी येते तेव्हा लोकांमध्ये गैरसमज पसरतो. जरांगे पाटील आणि आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतो हे तुम्ही पाहिलं असेल, असं शिरसाठ म्हणाले.

तसेच पुढे बोलताना, मराठा समाजामध्ये गैरसमज झाला की मी हे काहीतरी घडवतोय तर त्याचा परिणाम वाईट होतो याची जाणीव मला आहे. या प्रकरणानंतर बातमी अशी लागली की संजय शिरसाटांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे विधान करण्यात आलं. पण मी स्पष्ट करु इच्छितो की असा कोणताही कार्यक्रम मी आयोजित केलेला नव्हता. माझ्या त्याच्याशी काहीही संबंध नाही आणि जरांगे पाटलांबद्दल आम्हाला आदर आहे, असं शिरसाठ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या