Sunday, April 27, 2025
Homeनाशिकभाम धरणाचे जलपूजन

भाम धरणाचे जलपूजन

घोटी । वार्ताहर Ghoti

इगतपुरी तालुक्याचा ( Igatpuri Taluka ) राष्ट्र उभारणीत मोलाचा सहभाग आहे. अनेक प्रकल्प या ठिकाणी असतांना विकासाचा महामेरू धावता ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. स्थानिक युवकांना रोजगार व शेतकर्‍यांच्या हितासाठी विशेष अधिवेशन बोलावले जाईल, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jhirwal )यांनी केले.

- Advertisement -

भाम धरण ( Bham Dam ) भरल्याने त्याच्या जलपूजनप्रसंगी झिरवाळ उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. हिरामण खोसकर, नवी मुंबई नगरसेवक अरविंद नाईक, माजी आ. शिवराम झोले, पांडुरंग गांगड, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, गोरख बोडके, पांडुरंग शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, दौलत दुभाषे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अरुण गायकर, कमलाकर नाठे, पोपट भागडे, मदन कडू, युवक तालुकाध्यक्ष पंकज माळी, अ‍ॅड गणपत चव्हाण, मल्हारी गटकळ, भोलेनाथ चव्हाण, अनिता घारे आदी उपस्थित होते.

भावली धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर दहा दिवसानंंतर उशिरा भाम धरण भरले आहे. तसेच शेतकर्‍यांना पाणी वापरण्याचे नियोजन झाले. जिल्ह्यात पहिल्यांदाच इगतपुरी तालुक्यातील हे धरणे ओसंडून वाहत असल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त आहे. पंतप्रधान सिंचन योजनेतून बांधलेल्या काळूस्ते परिसरातील भाम धरणाचे जलपूजन विधिवत झाले. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियानात सागर शिंदे, उपविभागीय अधिकारी अरुण निकम, शाखा अभियंता सुरेश जाचक केतन पवार, प्रदीप पवार आदींनी संयोजन केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “एकही पाकिस्तानी नागरिक…”; CM फडणवीसांचे मोठे विधान, नेमकं...

0
पुणे | Pune  देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) पाकिस्तानी लोकांना (Pakistani People) देश सोडण्याची नोटीस दिली आहे. त्यांना...