Sunday, April 27, 2025
Homeनगरखून प्रकरणातील फरार आरोपीस दहा महिन्यांनंतर अटक

खून प्रकरणातील फरार आरोपीस दहा महिन्यांनंतर अटक

जामखेड | तालुका प्रतिनिधी

दहा महिन्यापुर्वी ऐन दिवाळीत तीस वर्षीय तरुणाचा मोबाईल चोरीच्या कारणावरून धोत्री परिसरात खुन करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी स्वप्निल नामदेव थोरात (वय २९) वर्षे हा फरार होता. यास दहा महिन्यांनंतर अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.

- Advertisement -

जामखेड जवळील साकत रोडवर धोत्री शिवारात जुन्या काँटन जिनिंग मीलच्या गेटसमोर मयत गणेश शिवाजी वारे (वय ३० वर्षे रा. संगम जळगाव ता. गेवराई जि. बीड) या तरुणाचा काठीने व पाईपने मारहाण करून खुन करण्यात आला होता. या घटनेतील एका आरोपीस जामखेड पोलीसांनी अटक केली होती. तर दुसरा आरोपी स्वप्निल नामदेव थोरात हा तेव्हापासून म्हणजे दहा महीन्यांपासून फरार होता पोलीस त्याचा शोध घेत होते.

या घटनेबाबत ७ ऑगस्ट २०२३ रोजी आरोपी स्वप्निल नामदेव थोरात हा सावरगाव येथील आपल्या घरी असल्याची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे सपोनि सुनील बडे यांना मिळाली. यानंतर त्यांनी तात्काळ त्याच्या पथकासह सावरगाव या ठिकाणी आरोपीच्या घरी जाऊन ताब्यात घेऊन अटक केली. सध्या हा आरोपी पोलीस कोठडीत आहे.

सदरची कामगीरी अहमदनगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे, पो.ना.कोपनर, पो.ना अविनाश ढेरे, पो.ना. भागवत, पो.कॉ. परेदेशी, पो.कॉ विजय सुपेकर, पो.कॉ नवनाथ शेकडे, पो. कॉ. सचिन देवढे, म.पो.कॉ. धांडे यांच्या पथकाने केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...