Monday, September 28, 2026
Homeक्राईमJamkhed : अवैध गुटखा आणि मावा विक्रेत्यांवर छापा

Jamkhed : अवैध गुटखा आणि मावा विक्रेत्यांवर छापा

जामखेड तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) 28 ऑगस्ट रोजी जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नान्नज व कोल्हेवाडी येथे छापे (Raid) टाकून सुगंधित तंबाखू (Scented Tobacco), मावा (Mawa) व गुटख्याची बेकायदा विक्री करणार्‍यांवर कारवाई केली. पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

- Advertisement -

नान्नज येथे गणेश शिवाजी गोरे (28), विशाल शिवाजी वटाणे (28), वृषभ राजेंद्र पोते (24) व योगेश लक्ष्मण मोहोळकर (24) यांच्यावर गुन्हे दाखल करून सुगंधित तंबाखू व मावा जप्त करण्यात आला. या प्रकरणातील मालपुरवठादार आप्पा कुमटकर (रा. राजेगाव, ता. जामखेड) फरार आहे. कोल्हेवाडी येथे युवराज नारायण कोल्हे (38) याच्याकडून 97 हजार रुपये किमतीचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला.

या प्रकरणातील सचिन जाधव (रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड) फरार आहे. जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष खैरे, शाहीद शेख, संदीप पवार, राहुल द्वारके, प्रशांत राठोड, अरुण गांगुर्डे, भीमराज खर्से, योगेश कर्डीले, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, दीपक जाधव, गणेश धोत्रे, अमोल कोतकर, अमोल आजबे, मनोज साखरे, प्रकाश मांडगे व प्रताप देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

Sharad Pawar : “सरकारी मदत अपुरी, नवे निर्णय घ्या”; शरद पवारांची...

0
मुंबई | Mumbai राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील ७५ टक्के भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यात तीव्र दुष्काळाची सावली असून, तब्बल २६५ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. विशेषतः...