Friday, April 25, 2025
HomeनगरJamkhed News : बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील यांच्यावर हल्ला

Jamkhed News : बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील यांच्यावर हल्ला

तीन महिलांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मागील भांडणाच्या कारणावरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व खर्डा येथील सरपंच पती वैजीनाथ पाटील यांच्यावर दहा जणांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी तीन महिलांसह एकूण दहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

वैजीनाथ पाटील हे खर्डाच्या सरपंच संजीवनी पाटील यांचे पती आहेत. फीर्यादी वैजनाथ पाटील दि. 4 एप्रिलला रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या मित्रांसोबत खर्डा शहरातील एका खानावळीमध्ये गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी श्रीकांत लोखंडे हा हॉटेल समोरुन एक दोन वेळा गेला होता. यानंतर रात्री अकरा वाजता फीर्यादी वैजनाथ पाटील हे हॉटेलमध्ये असताना वरील आरोपी हातात लोखंडी पाईप व लाकडी दांडके घेऊन आले व ‘हे पाटील माजलेत, याला जीवे मारा’ अशी धमकी देत हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात सुरुवात केली. या घटनेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना जामखेड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पाटील यांनी दि 5 एप्रिलला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गहिनीनाथ मुकुंद खरात, श्रीकांत भिमराव लोखंडे, बारक्या नवनाथ खरात, मुकुंद खरात (पूर्ण नाव माहीत नाही), संभाजी केरु खरात, ओंकार परमेश्वर इंगळे, संजीवनी संभाजी खरात, पुजा गहिनीनाथ खरात, सविता बाळासाहेब खरात व एक अनोळखी इसम (सर्व रा. शुक्रवार पेठ, खर्डा ता. जामखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...