Wednesday, September 30, 2026
Homeक्राईमBribery News : जामखेड नगरपरिषदेतील दोन कर्मचारी लाचलुचपत जाळ्यात

Bribery News : जामखेड नगरपरिषदेतील दोन कर्मचारी लाचलुचपत जाळ्यात

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जामखेड नगरपरिषदेतील दोन लोकसेवकांवर जन्म दाखल्यासाठी तीन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी बुधवारी (दि.6) कारवाई केली आहे. अभिजीत जालिम भैसडे (वय 39, लिपिक, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग), अहमद इलियास शेख (वय 43, मदतनीस, अग्निशामक दल, कंत्राटी) अशी कर्मचार्‍यांची नावे आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक 26/11/2025 रोजी त्यांनी मुलांचा जन्म दाखला मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक भैसडे यांनी लोकसेवक शेख यांना संपर्क करण्यास सांगितला असता त्याप्रमाणे तकारदार यांनी लोकसेवक भैसडे याच्या सांगण्यावरून लोकसेवक शेख याला संपर्क केला असता शेख यानेे तक्रारदाराकडे दोन जन्मदाखल्यांसाठी प्रत्येकी 1500 रूपये प्रमाणे 3,000 रूपये लाचेची मागणी केल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला 05/05/2026 रोजी प्राप्त झाली होती.

त्यानूसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचत शेख याला 3,000 रूपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. भैसडे याने शेख याला लाच घेण्यासाठी कारवाई प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, चंद्रकांत भिमसेन काळे, किशोर विठठल कुळधर, शेखर बाळासाहेब वाघ, दशरथ भिमराव लाड यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 350 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 3653 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...