Saturday, May 4, 2024
Homeनगरजामखेडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता

जामखेडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील एक बडा नेता राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. हा राजकीय भूंकप नव्या वर्षाच्या सुरूवातीला होण्याचे संकेत आहेत. यामुळे आ. रोहित पवार यांना धक्क्यावर धक्के देण्याचा उपक्रम सुरूच असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

जामखेड तालुक्यातील पवार निष्ठ असलेले व तालुक्यात स्व कर्तृत्वाने उभारी घेणारा एक मोठा नेता राष्ट्रवादी सोडण्याच्या स्थितीत असून पुढील येणार्‍या नवं वर्षात जामखेड तालुक्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पवारनिष्ठ राष्ट्रवादी सोडत असल्याने हा पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी सोडल्यानंतर ते भाजप सेनेत जाणार किंवा भाजप- राष्ट्रवादीसमोर तिसरा पर्याय ठेवत नव्या इनिंगला सुरुवात करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

जामखेड तालुक्यात राष्ट्रवादीला एकामागे एक असे धक्के बसत आहेत. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून भाजप, शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीला आणखी मोठा झटका बसण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे विश्वासू व जिल्हा कार्याध्यक्षपासून ते कर्तृत्वाने थेट प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारणारे जामखेड तालुक्यातील हे नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. या नेत्याने गेल्या दोन वर्षपासून कर्जत-जामखेड तालुक्यात सामाजिक कामाच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभारली असून त्याच्या या उपक्रमाला कर्जत-जामखेड तालुक्यातील असंख्य तरुण जोडले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या