Tuesday, April 29, 2025
Homeनगरजामखेडकरांकडून 23 लाखांचा दंड वसूल

जामखेडकरांकडून 23 लाखांचा दंड वसूल

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड पोलीसांनी शहरातील वाहतूक नियंत्रण करताना नियम भंग करणार्‍या वाहनचालकांवर विविध प्रकारच्या कारवाया करत तब्बल जानेवारी 2022 ते ऑक्टोबर 2022 या सात महिन्यांत 22 लाख 72 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

- Advertisement -

जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. यामध्ये वाहतुकीस अडथळा करणारी वाहने न्यायालय केसेस 28 – दंड 5600, अवैध प्रवाशी वाहतूक 5 केसेस – 13 हजार 300 रुपये दंड, दारू पिऊन वाहन चालवणे 9 केसेस – 16 हजार 900 दंड, ऑनलाईन 3 हजार 923 केसेस 22 लाख 72 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन धारकांना शिस्त लावण्याबरोबरच दंडाची मोठी रक्कम वसूल करून शासनाला मोठा महसूल मिळवून देण्याचे कामही जामखेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेकडून केले आहे. या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉ. दिनेश गंगे, होमगार्ड रफिक तांबोळी यांनी ही कामगिरी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : एमआयडीसीतील कंपनीतून सव्वा दोन लाखांच्या स्क्रॅपची चोरी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar एमआयडीसीतील मिस्त्री ऑटो इंजिनिअर प्रा. लि. कंपनीतून तब्बल दोन लाख 20 हजार रुपये किमतीचे 2.5 टन वजनाचे लोखंडी शीट व स्क्रॅपचे तुकडे...