Thursday, February 5, 2026
Homeनगरएसटी-कारच्या अपघातात दोन ठार तीन जखमी    

एसटी-कारच्या अपघातात दोन ठार तीन जखमी    

जामखेड-खर्डा रोडवर भीषण घटना

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील जामखेड-खर्डा रोडवर (Jamkhed Kharda Road) बटेवाडी शिवारात एसटी बस व कारमध्ये झालेल्या भिषण अपघातात (ST Bus and Car Accident) दोन ठार तर तिघे गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यामध्ये विजय गंगाधर गव्हाणे (24), पंकज सुरेश तांबे (24), हे मयत झाले असून यात मयूर संतोष कोळी (18), सचिन दिलीप गीते (30), अमोल बबन डोंगरे (28 रा. सर्व रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) अशी जखमींची नावे आहेत.

- Advertisement -

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेड-खर्डा रोडवर कोल्हे पेट्रोल पंप जवळ, खर्डाकडे जाणारी एसटी बस क्रमांक (एमएच 09 एफएल 1027 (कोपरगाव ते हैदराबाद) तर जामखेडकडून खर्डा कडे येणारी शेरोलेट बीट कार क्रमांक एमएच 16 एटी 6492 या वाहनांमध्ये समोरासमोर अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात शेरोलेट कारमधील 5 जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जामखेड येथील खासगी हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचार करून नगर येथे सिव्हिल हॉस्पिटलला पाठविलेले होते.

YouTube video player

त्यापैकी 2 जणांचा मृत्यू (Death) झाला. तर तिघांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एसटी चालक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वाखारे, जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांनी भेट दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी...