दिल्ली । Delhi
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यानंतर भाजपला धक्का बसला आहे. काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.
- Advertisement -
नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस पक्ष जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करणार आहेत. काश्मीरमध्ये भाजपला जनतेनं नाकारलं आहे. नॅशनल कॉन्फरन्सनच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला असून मिठाई वाटली जात आहे.
दरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेत ते जाहीर केलं आहे. अब्दुल्ला म्हणाले, आपल्या इंडिया आघाडीला बहुमत मिळत असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे लवकरच ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.