नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) रामबन जिल्ह्यातील (Ramban District) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सैनिकांची गाडी रस्त्यावरून घसरून अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. सदर गाडी जवळपास ७०० फूट खोल दरीत कोसळल्याने या अपघातात भारतीय लष्कराच्या तीन जवानांचा मृत्यू (Death) झाला आहे.
याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैनिकांचा ट्रक NH-44 या महामार्गावरून जात होता. हा ट्रक जम्मू-श्रीनगरला जाणाऱ्या सैनिकांच्या (Army) ताफ्यातील एक भाग होता. अपघात झाल्यानंतर लगेच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. यावेळी एसडीआरएफ, पोलीस, सैन्य आणि स्थानिक स्वयंसेवकांनी एकत्र मिळून बचाव कार्य सुरु केले. या भीषण अपघातात वाहनाचा अक्षरश: चक्काचूर झाला असून, या ट्रकमध्ये तीन सैनिक होते. दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे.
Jammu & Kashmir | Three soldiers died when an army truck they were travelling in fell about 200-300 metres in a gorge at Ramban's Battery Chashma. Police, SDRF, Army and locals carried out the rescue operation. The truck was going to Srinagar from Jammu along with a convoy, and…
— ANI (@ANI) May 4, 2025
दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन जवानांची (Soldiers) ओळख पटली आहे. त्यांची नावे अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादुर अशी आहेत.त्यांचे मृतेदह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले असून, सैन्य आणि प्रशासनाकडून जवानांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यात आला आहे. तर अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
याआधीही झाला होता अपघात
जम्मू-काश्मीरच्या पुंछमधील मेंढर सब-डिव्हिजनच्या बलनोई भागात डिसेंबर २०२४ मध्ये भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले होते. त्यावेळी ५ जवान शहीद झाले होते, तर ५ गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी सैनिकांची गाडी ३०० फूट खोल दरीत पडली होती.