Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजजनसन्मान यात्रा : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका

जनसन्मान यात्रा : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसनेते अजित पवार यांचे आवाहन

- Advertisement -

नाशिकरोड | प्रतिनिधी Nahikroad

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा प्रचार करून यश मिळविले आता मात्र विधानसभा निवडणुकीत तसे होऊ देऊ नका विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका आम्ही जातीपातीचा विचार न करता समाजासाठी काम करतो त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणा व पुन्हा महायुतीचे सरकार राज्यात निवडून द्या असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नामदार अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने जनसन्मान यात्रा सुरू करण्यात आली असून सदरची यात्रा ही देवळाली मतदारसंघात आल्यानंतर त्यानिमित्त आमदार सरोज अहिरे यांनी विहितगाव येथील साई ग्रँड लॉन्स मध्ये या जनसन्मान यात्रेनिमित्त लाडक्या बहिणीं सोबत संवाद हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलत होते.

आपल्या भाषणात नामदार अजित पवार म्हणाले की, महायुतीचे सरकार पुन्हा निवडून आले तर लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुद्धा सुरू राहणार आहे त्यासाठी महायुतीचे सरकार आलेच पाहिजे हा विचार करून आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पुन्हा निवडून द्या. आमचे विरोधक खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करत आहे काही नेते खालच्या पातळीवर टीका करतात ही काही महाराष्ट्राची संस्कृती आहे का असा असा सवाल करून नामदार अजित पवार म्हणाले की सर्वांनी सन्मानाणे पुढे जावे अशीच माझी इच्छा आहे त्यासाठी गरीब आणि विकास या गोष्टींना महत्त्व देऊन राष्ट्रवादी पुढे जाईल. जनता हीच देव आहे ही शक्ती माझ्यामागे आहे सत्ता असल्याशिवाय विकास कामे होत नाही मतदारांच्या समस्या सुटल्या पाहिजे यासाठी आम्ही एक वर्षांपूर्वी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला शेवटी कामे ही सत्ता असल्याने होतात असे बोलून नामदार अजित पवार म्हणाले की विरोधक खोटा प्रचार करतात मात्र आम्ही दिलेला शब्द पाळतो. लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये येत्या 17 तारखेला महिलांना मिळणार आहे रक्षाबंधन पूर्वी ही महिलांना भेट आहे. महायुती सरकारने राज्यातील जनतेसाठी विविध योजना आणल्या शेतकऱ्यांना मोफत वीज दिली युवकांसाठी विविध प्रकारच्या योजनाआणून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे जनतेचा व गोरगरिबांचा विकास हेच आमचे ध्येय असल्याचे ते म्हणाले.

प्रारंभी प्रास्ताविक देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी केले व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नामदार छगन भुजबळ नामदार अनिल पाटील धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर देविदास पिंगळे निवृत्ती अरिंगळे मनोहर कोरडे सोमनाथ बोराडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी या जन सन्मान यात्रेचे देवळाली गाव येथील महात्मा गांधी पुतळ्या जवळ नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार सरोज आहिरे तसेच मनोहर कोरडे निवृत्ती अरिंगळे विक्रम कोठुळे वसंत अरिंगळे चैतन्य देशमुख विनोद देशमुख मनोहर कोरडे बाळासाहेब मस्के आदींनी स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या